
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे. एकीकडे जोरदार पाऊस तर दुसरीकडे प्रचंड उकाडा अशी विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे....
येत्या दोन दिवसात पश्चिम बंगालच्या उपसागरात 'मोचा' चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे हवामानात पुढील काही दिवस बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक, अहमदनगर, पुणे, मराठवाड्यामध्ये परभणी लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात हवामान विभागाने ऑरेंट अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे. शेतात तयार झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.
कोकणात आंबा आणि काजूवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचा कांदा सडला आहे. तर पावसामुळे रब्बी आणि खरीप पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.