विद्यापीठांच्या परिक्षा होणार ऑनलाईन

उदय सामंत यांची माहिती
विद्यापीठांच्या परिक्षा होणार ऑनलाईन
उदय सामंत

मुंबई -

करोना संकटामुळे राज्यात ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नसून राज्यातली कृषी विद्यापीठं वगळता सर्व तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल. प्राध्यापक भरती होणारच नाही, अशा ज्या चर्चा सुरु आहेत त्यावर विश्‍वास ठेवू नये, असेही उदय सामंत म्हणाले.

ते म्हणाले, आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. सर्व तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील. उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळं निकाल लवकर लागेल. तेराही अकृषी विद्यांपीठात उद्यापासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परिक्षा ऑनलाईन असेल, राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा मनोदय आहे. 18 ते 25 वयोगटातील हे विद्यार्थी आहेत त्यामुळं त्याचं लसीकरण होणं गरजेचे आहे.

लॉ च्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. प्राध्यापक भरतीबाबतही चर्चा झालीय. ही भरती करणार आहोत. फक्त कोविड संकट कमी झाल्यावर होईल, प्राध्यापक भरती होणार नाही, अशा चर्चांवर विश्‍वास ठेवू नये.

एनसीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत

एनसीसी व एनएसएसच्या प्रमुखांशी बोलणार आहे. हे विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील. संजय ओक यांनी तसं आवाहन केले होते. त्यांच्याशीही मी बोलणार आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन कमतरता नाही. लस व रेमडेसिवीरचे समान वाटप केंद्राने करावे, असेही उदय सामंत म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com