पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; काकाने केली पुतण्याची चाकूने भोसकून हत्या

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; काकाने केली पुतण्याची चाकूने भोसकून हत्या

पालघर | Palghar

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून चुलत काकाने आपल्या पुतण्याची चाकूने वार करून हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाणगाव पोलिसांनी काकाला अटक केली आहे...

दिनेश हरिश्चंद्र तांडेल असे संशयित काकाचे नाव आहे. अतुल विलास तांडेल असे मयत पुतण्याचे नाव आहे. याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; काकाने केली पुतण्याची चाकूने भोसकून हत्या
Prithvi Shaw : पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

दिनेश तांडेल याला आपला चुलत पुतण्या अतुलचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने पुतण्याच्या घरात घुसून हॉलमध्ये झोपलेल्या पुतण्याला कायमचे संपवले. पुतण्याची हत्या केल्यानंतर काका फरार झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; काकाने केली पुतण्याची चाकूने भोसकून हत्या
शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र; केली 'ही' मागणी

पोलिसांनी घटनास्थळी दाखल मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा नोंद करत संशयिताचा शोध सुरु केला. पोलिसांनी अवघ्या काही तासातच संशयिताला सापळा रचून जंगलातून अटक केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com