
मुंबई | Mumbai
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी कंपनीतील भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच या स्फोटाच चार ते पाच जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचा आकडा अद्याप स्पष्ट नाहीये परंतु या अपघातात अनेक कामगार मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोट एवढा भयंकर आणि भीषण होता की तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर,परिसरातील घरांना हादरे बसलेले आहेत.