राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार?; उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले...

राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार?; उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले...
उदय सामंत

मुंबई | Mumbai

राज्यातील शाळांची (Maharashtra School Reopen) घंटा येत्या ४ ऑक्टोबरपासून वाजणार आहे. मात्र राज्यातील कॉलेजेस (Maharashtra College Reopen) कधी सुरू होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती. मात्र, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी कॉलेज कधी सुरु होणार यासंदर्भात माहिती दिली आहे.

उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटलं आहे की, कॉलेजचे शैक्षणिक वर्ष (Academic year) सुरु होत आहे. १ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात कॉलेजेस सुरु करणार असल्याची माहिती पसरत आहे. तर १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे युजीसीचे म्हणणे आहे. पण त्याच कालावधीत आपल्याकडे दिवाळीचा सण आहे. त्यामुळे दिवाळीचा सण गेल्यानंतर कॉलेज सुरु करण्याची परिस्थिती आहे. किती टक्क्यांमध्ये कॉलेज सुरु करण्यात येणार याबाबत विचार सुरु आहे. परंतु दिवाळीनंतर प्रत्यक्षात कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटीच्या परीक्षा झाल्याशिवाय, त्याचा निकाल लागल्याशिवाय कॉलेज सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ही परीक्षा लांबली तर महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख अजून पुढे जाईल. ज्याठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. याविषयी राज्य कृती दल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.

९ आणि १० ऑक्टोबरला सीईटीच्या परीक्षा

दरम्यान गुलाब चक्रीवादळामुळं मराठवाड्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली. मराठवाड्यातील शेतीचं नुकसान तर झालंच होतं. तर, औरंगाबाद आणि नांदेडमधील विद्यार्थी देखील पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सकाळी सीईटी परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत पुन्हा परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता ९ आणि १० तारखेला सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

Related Stories

No stories found.