दुचाकीची उड्डाणपुलाच्या कठड्याला जोरदार धडक; दोन तरुण पडले २५ फूट खाली

अपघात | Accident
अपघात | Accident

भिवंडी | Bhiwandi

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला विचित्र अपघात झाल्याची घटना भिवंडी (bhiwandi)परिसरात घडली आहे. राजीव गांधी उड्डाणपुलावरून (rajiv gandhi bridge) भरधाव वेगात जाणाऱ्या तरुणांची दुचाकी 25 फूट खाली पडली. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी (Injured) झाले आहे...

जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिवंडी शहरातील जकात नाका येथील राजीव गांधी उड्डाणपुलावर ही घटना घडली.

वेगाने आलेल्या दुचाकीची पुलाच्या कठड्याला धडक बसली. दोन तरुण पुलावरून थेट 25 फूट खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहे. सादाब शेख, शंकर पवार, इरफान अंसारी असे जखमी झालेल्या तरुणांची नाव आहे.

अपघात | Accident
अफगाणिस्तान हादरलं! काबूलच्या मशिदीत भीषण बॉम्बस्फोट, २० जणांचा मृत्यू

हे तिघे वाढदिवसाची पार्टी करून स्कुटी वरून वेगात येत होते. सादाब शेख आणि शंकर पवार हे दोघे पुलावरून खाली पडले. इरफान अंसारी हा पुला वरतीच पडला. त्यामुळे तो घटनास्थळावरून तो पळून गेला आहे. जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com