
मुंबई | Mumbai
आज राज्यभरासह मुंबईत दहीहंडी (Dahihandi) उत्सव जोरात साजरा केला जात आहे. विविध ठिकाणी दहीहंड्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र मुंबईत दहीहंडी फोडताना दोन गोविंदा (Govinda) जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दहीहंडीचे मनोरे रचताना अनेक बाळगोपाळांना दुखापत होते, त्यामुळे ठिकठिकाणच्या महापालिका सतर्क आहे. आतापर्यंत मुंबईत (Mumbai) दोन गोविंदा जखमी (injured) झाले असून एक गोविंदाला केईएम रुग्णालयात आणि एकाला राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही परिस्थिती चिंताजनक नसल्याचे समजते.
दरम्यान, मुंबईत (Mumbai) आज भाजपच्या (BJP) वतीने ४०० दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. लालबागमध्ये भाजपने बदलाची दहीहंडी उभारली आहे. तर वरळीत परिवर्तनाची दहीहंडी उभारली आहे. याशिवाय ठाण्यात मनसेच्या (MNS) अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक ९ थर रचणार आहेत. याठिकाणी मनसेने १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे.