ताज हॉटेलमध्ये दोन बंदूकधारी ; फोनने खळबळ

ताज हॉटेलमध्ये दोन बंदूकधारी ; फोनने खळबळ

मुंबई - मुंबईतील ताज हॉटेल पॅलेसमध्ये दोन बंदूकधारी घुसणार आहेत असा निनावी कॉल हॉटेल प्रशासनाला मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती. पण पोलिसांनी तपास केल्यानंतर हा फोन सातार्‍यातील एका नववीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने केला असल्याचे उघड झालेे.

ताजच्या व्यवस्थापनाने निनावी कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळविले होते. हा फोन कॉल एका मुलाने केला होता आणि त्यामध्ये गंभीर काहीही आढळले नाही. अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com