
मुंबई | Mumbai
येथील कांदिवली परिसरातील (Kandivali Area) वीणा संतूर इमारतीला (Veena Santoor Building) दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू (Death) झाला आहे. तर तीन जण जखमी झाले असून होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे....
याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील महावीरनगर (Mahavir Nagar) येथील वीणा संतूर इमारतीला दुपारी १२.२७ वाजता ही आग लागली. सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीच्या (Sachin Tendulkar Cricket Academy) बाजूला असलेल्या या इमारतीच्या ग्राऊंड आणि पहिला मजला अशा दोन मजल्यांवर ही आग भडकली.
तसेच सदर आग लेवल एक प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने (Mumbai Fire Brigade) दिली. त्यानंतर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर या आगीत (Fire) अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच या आगीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, जखमींवर जवळच्या रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु असून त्यांच्यावर सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. तसेच आगीचे कारण अद्याप समोर आले नसून स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक पुढील तपास करत आहेत.
मृतांची आणि जखमींची नावे
ग्लोरी (वय ४३) आणि जोसू रॉबर्ट (वय ०८) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मी बुरा (वय ४०), राजेश्वरी भरतारे (वय २४), रंजन शाह (वय ७६) अशी जखमींची नावे आहेत.