मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; १३ ठार, २३ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; १३ ठार, २३ जखमी

सिंधुदुर्ग | Sindhudurg

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) आज दोन भीषण अपघात झाले आहेत. पहिला अपघात कार आणि ट्रकचा झाला असून यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे...

तर दुसरा अपघात खासगी बसचा (Bus Accident) झाला असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; १३ ठार, २३ जखमी
Video : वलखेड फाट्यावर 'द बर्निंग कार'चा थरार

आज पहाटे चार वाजता गडनदी पूलाच्या धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये एकूण 36 प्रवासी असल्याचे समजते.

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; १३ ठार, २३ जखमी
नाशकात चाललंय तरी काय? पुन्हा एकाचा निर्घुण खून

खासगी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. आज पहाटे चार वाजता गडनदी पूलाच्या धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस उलटली. अपघातात चार प्रवासी ठार तर 23 जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; १३ ठार, २३ जखमी
काय सांगता? 18 लाखांचा 'चोरी'स गेलेला रस्ता शोधण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांचे पथक जंगलात

मुंबई-गोवा महामार्गावर आज आणखी एक अपघात झाल्याचे वृत्त आहे. ट्रक आणि कारच्या अपघातात 9 जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात मुंबई, गोवा महामार्गावर गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोपोली गावाजवळ झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com