कल्याण डोंबिवली महापालिकेचे ट्विटर अकाऊंट हॅक

कल्याण डोंबिवली महापालिकेचे ट्विटर अकाऊंट हॅक

कल्याण | Kalyan

कल्याण डोंबिवली महापालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे केडीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे. काही वेळाने अकाऊंट रिकव्हर करण्यात यश आले आहे...

केडीएमसीच्या ट्वीटर अकाऊंटचे नाव vitalik.eth असे नाव बदलण्यात आले. चार-पाच ट्विट या अकाऊंटवर केले जात आहेत. इथेरियम ब्लॉक चेनच्या प्रमोशनचे ट्वीट केले जात होते. या ट्वीटमध्ये एक लिंकही देण्यात आली होती.

इथेरियम ब्लॉकचे मर्ज होणार आहे. त्यामुळे हे प्रमोशन केले जात असल्याचे म्हणण्यात आले होते. पालिकेला याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने ट्वीटर अकाऊंट पुन्हा रिक्व्हर करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. आता हे अकाऊंट रिकव्हर करण्यात यश आले आहे.

एखादे अकाऊंट हॅक झाले की, हॅकर्स संबंधित अकाऊंटवरून जाहिरात करत असतात. केडीएमसीच्या अकाऊंटमधून क्रिप्टोमधील इथेरियम प्रमोशन करण्यात येत होते. हॅकर्सने क्रिप्टोबाबत अनेक ट्विट केले. तसेच ट्विटर हॅण्डलचे नाव आणि डिस्क्रिप्शनही बदलण्यात आले.

- साईनाथ नागरे, उपमहाव्यवस्थापक, सायबर सिक्युरिटी, रिलायन्स इंडस्ट्रीज.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com