Buldhana Accident : भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडलं; तिघे जागीच ठार

Buldhana Accident : भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडलं; तिघे जागीच ठार

बुलढाणा | Buldhana

बुलढाण्यात (Buldhana) नागपूर - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर (Nagpur-Mumbai National Highway) भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रक झोपलेल्या मजुरांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

चिखलदरा तालुक्यातील मोरगाव येथील दहा मजूर रोजगाराच्या शोधात भटकंती करत नांदुरा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात रुजू झाले. महामार्गालगत झोपडीत झोपले असताना आज पहाटेच्या सुमारास PB-11/CZ 4047 या आईसर वाहनाच्या भरधाव गाडी चालवत वडनेर भोजली एन एच सिक्स गावाजवळ मजुरांच्या झोपडीत भरधाव गाडी घुसल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले.

Buldhana Accident : भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडलं; तिघे जागीच ठार
ईदच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; पोलिस अधिकाऱ्यासह 34 ठार, अनेक जखमी

पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात एकूण ४ जण ठार, तर ६ जण जखमी झालेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीही या अपघाताची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, कामाच्या शोधात गेलेल्या मजुरांना आज सकाळी ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना समजली. आम्ही याविषयी तत्काळ स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. गंभीर जखमींना अमरावती येथील रुग्णालयात शिफ्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमचे एक पथक घटनास्थळी रवाना झाला असून, पीडितांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे.

Buldhana Accident : भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडलं; तिघे जागीच ठार
बैलगाडा शर्यतीच्या वादातून मोठा राडा! समृद्धी महामार्गावर दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com