पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

पुणे - पुणे शहरात आज 136 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 223 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या 2 हजार 470 सक्रिय रुग्ण आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विविध तपासणी केंद्रांवर 3 हजार 872 संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत करोनाबाधितांची टक्केवारी ही 3.51 टक्के इतकी आहे. तर आज 17 जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी 11 जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा 1.79 टक्के इतका आहे.

पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण
अजित दादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होते , पण...

पुणे शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही 359 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणार्‍यांची संख्या 503 इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत 26 लाख 18 हजार 784 जणांची करोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी 4 लाख 75 हजार 990 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी 4 लाख 64 हजार 983 जण करोनामुक्त झाले आहे. शहरात आतापर्यंत 8 हजार 537 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण
लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य नाही
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com