पुणे -

पुणे शहरात आज 238 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पुणे विभागातील करोना रूग्णांची एकूण संख्या 1 लाख 78 हजार 258 इतकी

झाली आहे. आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 4 हजार 623वर पोहोचला आहे. चांगली गोष्ट म्हणजे, दिवसभरात 480 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 70 हजार 51 इतकी झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 121 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 156 जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 96 हजार 316 वर पोहोचली आहे. त्यातील 93 हजार 107 जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 644 एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.