मुंबई -

मुंबईत आज 897 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 3 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील

करोनाबाधितांची संख्या 3 लाख 18 हजार 207वर पोहोचली आहे. यापैकी 11 हजार 438 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज मुंबईतील 571 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 2 लाख 99 हजार 6 कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 6 हजार 900 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 94 टक्के आहे. 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील कोरोना वाढीचा दर 0.19 टक्के एवढा होता. तर मुंबईतील दुप्पटीचा दर 371 दिवस आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या एकूण 31 लाख 17 हजार 294 चाचण्या झाल्या आहेत.