मुंबई -

मुंबईत आज 736 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 16 हजार 487 इतकी

झाली आहे. आज 473 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत 2 लाख 97 हजार 995 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आज 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे मुंबईत आतापर्यंत 11 हजार 430 मृत्यू झाला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 94 टक्के इतका आहे. गेल्या 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत कोरोनाचा ग्रोथ रेट 0.17 टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे 17 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत 30 लाख 80 हजार 528 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.