<p><strong>मुंबई -</strong> </p><p>मुंबईत आज 463 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची </p>.<p>संख्या 3 लाख 10 हजार 597 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 11 हजार 378 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात मुंबईतील 591 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुक्त होणार्या रुग्णांची संख्या 2 लाख 92 हजार 816वर पोहोचली आहे.</p>