मुंबई -

मुंबईत आज 1 हजार 12 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर दोन करोनाबाधित रुग्णांचा मृ्त्यू झाला

आहे. मुंबईत आतापर्यंत 33 लाख 55 हजार 558 करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत आज 1 हजार 51 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत करोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या 31 लाख 24 हजार 458 इतकी झाली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 736 अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत 11 हजार 506 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईचा विचार केला असता मुंबईत करोना रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका आहे. 2 मार्च ते 8 मार्चपर्यंत मुंबईत करोना वाढीचा दर हा 0.32 टक्के इतका आहे. 8 मार्चपर्यंत मुंबईत एकूण 34 लाख 54 हजार 129 करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या 21 सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर मुंबईत 214 इमारती सील बंद आहेत.