राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 88.1 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई -

राज्यात आज 16 हजार 177 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण 14 लाख 31 हजार 856 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 88.1 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 7 हजार 539 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील 24 तासात 198 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 84 लाख 2 हजार 559 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 25 हजार 197 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24 लाख 59 हजार 436 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 24 हजार 621 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 1 लाख 50 हजार 11 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 7 हजार 539 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 16 लाख 25 हजार 197 इतकी झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com