राज्यात आज करोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या अधिक

रिकव्हरी रेट 95.93 टक्के
राज्यात आज करोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या अधिक

मुंबई - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 8 हजार 752 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 9 हजार 812 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 179 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.0 टक्के आहे.

राज्याचा मृत्यूदर 2 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 58 लाख 81 हजार 551 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.93 टक्के इतके झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com