राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 95.89 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 13 हजार 758 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 6 हजार 270 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 94 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के इतका आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख 33 हजार 215 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.89 टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या 1 लाख 24 हजार 398 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,96,69,693 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,79,051 (15.07टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,71,685 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण
लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य नाही
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com