राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

676 मृत्यू
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबई -

महाराष्ट्रात आज 67 हजार 160 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 676 रूग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.76 टक्के इतका आहे.

दरम्यान, आज 63 हजार 818 रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 34,68,610 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.02 टक्के इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,54,60,008 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 42,28,836 (16.61 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,87,675 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,246 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com