राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

568 मृत्यू
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई -

राज्यात 67 हजार 13 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 40 लाख 94 हजार 840 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 62 हजार 479 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 568 मृत्यूंपैकी 309 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 158 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

उर्वरित 101 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. आज दिवसभरात उपचारानंतर बरे झालेल्या 62 हजार 298 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. .

राज्यात आतापर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 81.34 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के इतका झाला आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 48 लाख 95 हजार 986 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40 लाख 94 हजार 840 (16.45 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39 लाख 71 हजार 917 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29 हजार 14 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात 6 लाख 99 हजार 858 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com