राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

351 मृत्यू
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबई -

महाराष्ट्रात आज 58 हजार 924 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 351 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या 1.56 टक्के इतका आहे.

आज 52 हजार 412 रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 31,59,240 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 81.04 टक्के इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,40,75,811 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 38,98,262 (16.19 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 37,43,968 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 27,081 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 6,76,520 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com