मुंबई -

महाराष्ट्रात आज 59 हजार 907 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 322 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे

राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा 56 हजार 652 वर गेला आहे. आज बरे झालेल्या 30 हजार 296 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत राज्यात 31 लाख 73 हजार 261 करोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी सध्याच्या घडीला राज्यात 5 लाख 1 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी, 21 हजार 212 व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्याचा मृत्यू दर 1.79 टक्के इतका असल्याची नोंद झाली आहे.

मुंबईत 10 हजार 428 नवे रुग्ण सापडले

दरम्यान, मुंबईत आज 10 हजार 428 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 6 हजार 7 रुग्ण करोनातून बरे होऊन घरी देखील परतले आहेत. दिवसभरात मुंबईत 23 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या एकूण मृतांचा आकडा 11 हजार 851 इतका झाला आहे. तर एकूण करोनाबाधितांची संख्या 4 लाख 82 हजार 760 इतकी झाली आहे.

पुण्यात दिवसभरात 41 मृत्यूंची नोंद

पुणे शहरात दिवसभरात 5 हजार 651 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर आज अखेर करोनाबाधितांची 3 लाख 5 हजार 572 इतकी संख्या झाली आहे. याच दरम्यान पुण्यात 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 5 हजार 567 झाली आहे. त्याच दरम्यान 4 हजार 361 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर 2 लाख 53 हजार 734 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.