मुंबई -

महाराष्ट्रात आज 31 हजार 855 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. एकूण करोनाबाधितांचा आकडा

25 लाख 64 हजार 8816 इतका झाला आहे. यापैकी 2 लाख 47 हजार 299 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याचा रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवरून घसरत 88.21 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

वाढत्या करोनाबाधितांसोबतच मृतांचा दररोज वाढणारा आकडा राज्यासाठी चिंतेची बाब ठरला आहे. 23 मार्चला राज्यात तब्बल 132 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.

आज हा आकडा खाली आला असला, तरी दिवसभरात तब्बल 95 रुग्णांचे करोनाने बळी घेतले आहेत. त्यामुळे राज्यातल्या मृतांचा एकूण आकडा 53 हजार 684 इतका झाला आहे. यासोबतच राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्क्यांवर आहे.