राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 86.48 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई -

राज्यात आज 15 हजार 69 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 13 लाख 84 हजार 879 नवे करोना रुग्ण करोनामुक्त

झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 86.48 टक्के एवढे झाले आहेत. आज 5 हजार 984 नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात मागील 24 तासांमध्ये 125 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 81 लाख 85 हजार 778 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 1 हजार 365 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24 लाख 14 हजार 577 व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर 23 हजार 285 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात आज 1 लाख 73 हजार 759 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 5 हजार 984 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 16 लाख 1 हजार 365 इतकी झाली आहे. दरम्यान राज्यातील 15 हजार 69 रुग्ण मागील चोवीस तासांमध्ये बरे झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 13 लाख 84 हजार 879 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात राज्याचा रिकव्हरी रेट 86.48 टक्के इतका झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com