मुंबई -

राज्यात करोना संसर्गाबाबत चिंता वाढत असून करोनाला रोखण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात

आहेत. दरम्यान, आज राज्यात 88 करोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला असून, 15 हजार 602 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.3 टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात 52 हजार 811 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

याशिवाय आज 7 हजार 467 रुग्ण करोनातून बरे झाले, राज्यात आतापर्यंत एकूण 21,25,211 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 92.49 टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1,74,08,504 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 22,97,793 (13.20 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,70,695 व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर 5 हजार 31 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,18,525 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.