मुंबई -

राज्यात आज तब्बल 14 हजार 317 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 57 रुग्णांचा मृत्यू

झाला आहे. गेल्या 24 तासांतल्या आकडेवारीनुसार राज्यातली एकूण करोनाबाधितांची संख्या आता 22 लाख 66 हजार 374 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 6 हजार 70 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट अजूनही 92.94 टक्के इतका आहे.

पण दुसरीकडे सातत्याने वाढणार्या बाधितांची संख्येमुळे चिंता वाढली आहे. राज्यात आज एकूण 7 हजार 193 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यातल्या मृतांचा आकडा आतापर्यंत 52 हजार 667 इतका झाला आहे. राज्यातला सध्याचा मृत्यूदर 2.32 टक्के इतका आहे.