मुंबई -

महाराष्ट्रात आज 13 हजार 659 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 54 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

झाला आहे. राज्यात 7 मार्च रोजी 11 हजार 141, 8 मार्च रोजी 9 हजार 068 तर काल 9 मार्च रोजी 12 हजार 182 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.

दरम्यान आज 9 हजार 913 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात करणार्या रुग्णांची संख्या 20 लाख 99 हजार 207 इतकी झाली आहे. करोनाचा रिकव्हरी रेट यामुळे अजूनही 93.21 टक्क्यांवर असला, तरी नवीन रुग्णवाढीचा दर वेगाने वाढू लागला आहे.

आजच्या नव्या करोनाबाधितांच्या संख्येची भर पडल्याने राज्यातल्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 99 हजार 008 वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 52 हजार 610 झाला आहे.