मुंबई -

राज्यात आज 6 हजार 281 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 40 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली

आहे. आतापर्यंत करोनाने एकूण 51 हजार 753 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या 2.47 टक्के इतका आहे. आज राज्यात 6 हजार 281 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर 2 हजार 567 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 19 लाख 92 हजार 530 करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.16% इतके झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 56 लाख 52 हजार 742 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20 लाख 93 हजार 913 (13.38 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 28 हजार 60 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 1 हजार 610 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. काही दिवसांपूर्वी 30 हजारपर्यंत खाली आलेली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 48 हजार 439 इतकी झाली आहे.