मुंबई -

महाराष्ट्रात आज 4 हजार 787 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला

आहे. याचबरोबर 3 हजार 853 जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आतापर्यंत 20 लाख 76 हजार 93 इतकी झाली आहे. आतापर्यंत 19 लाख 85 हजार 261 जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या 38 हजार 13 असून, आजपर्यंत करोनामुळे 51 हजार 631 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.62 टक्के आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आजपर्यंत 15,43,55,268 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी 20 लाख 76 हजार 93 नमूने (13.43टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 95 हजार 704 जण गृह विलगीकरणात असुन, 1 हजार 664 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.