मुंबई -

महाराष्ट्रात आज 3 हजार 451 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 2 हजार 421 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे

प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.7 टक्के झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आतापर्यंत एकूण 19 लाख 63 हजार 946 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 35 हजार 633 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.7 टक्के झालं आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आज 30 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 51 हजार 390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.