मुंबई -

राज्यात आज 2,736 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 20 लाख 36 हजार 2 इतकी झाली आहे. राज्यात सध्या

34,862 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 46 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या 51,215 वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.52 टक्के एवढा आहे.

राज्यात आज 46 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई 5, अहमदनगर 3, पुणे 11, यवतमाळ 6, वर्धा 3 आणि अन्य राज्य 1 यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण 46 मृत्यूंपैकी 25 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 6 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 15 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 15 मृत्यू पुणे 7, यवतमाळ 5, अमरावती 2 आणि वर्धा 1 असे आहेत.

आज 5,339 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 19,48,674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.71 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,48,21,561 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20,36,002 (13.74 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,78,676 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,911 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.