मुंबई -

महाराष्ट्रात आज 2,630 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर 15,535 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज

देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 95.23 टक्के इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 20,23,814 वर पोहोचली आहे. तर 1,535 रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 19,27,335 इतकी झाली. तसेच दिवसभात 42 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आजवर मृत्यू झालेल्यांची संख्या 51,042 वर पोहोचली.

दरम्यान, राज्यात सध्या 44,199 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध कोविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच सध्या 1,91,975 लोक होम क्वारंटाइन आहेत. तर 2,324 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये पुणे प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर ठाण्याचा क्रमांक आहे. पुण्यात सध्या 13,504 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाण्यात 7,677 आणि त्यानंतर मुंबईत 5,769 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.