मुंबई -

महाराष्ट्रात आज 2 हजार 752 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1 हजार 743 जण करोनामुक्त

झाल्याने, त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 20 लाख 9 हजार 106 वर पोहचली आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 44 हजार 831 असून, 19 लाख 12 हजार 264 जण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 50 हजार 785 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.