मुंबई -

महाराष्ट्रात आज 3 हजार 314 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आज 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 2 हजार 124 रुग्ण बरे झाल्याने त्यांना

डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 19 हजार 550 इतकी झाली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रिकव्हरी रेट 94.29 टक्के आहे.

सध्या राज्यात 59 हजार 214 अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत 18 लाख 9 हजार 948 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,25,2,554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19 लाख 19 हजार 550 (15.35 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 57 हजार 385 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 3 हजार 323 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.