मुंबई -

राज्यात आज 1427 करोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 18 लाख 6 हजार 298 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 94.4 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 3 हजार 431 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यात मागील 24 तासांमध्ये 71 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यातला मृत्यू दर 2.57 टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 24 लाख 1 हजार 637 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19 लाख 13 हजार 382 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 77 हजार 58 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 3 हजार 695 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 56 हजार 823 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज नोंद झालेल्या 71 मृत्यूंपैकी 39 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर पाच मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 27 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.