मुंबई -

राज्यात आज 7 हजार 620 करोना रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 18 लाख 1 हजार 700 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात

आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा 94.51 टक्के इतका झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3913 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मागील 24 तासांमध्ये 94 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 48 हजार 969 मृत्यू करोनामुळे झाले आहेत. आज घडीला राज्यात 54 हजार 573 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 22 लाख 78 हजार 476 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19 लाख 6 हजार 371 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 88 हजार 723 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर 3 हजार 420 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.