मुंबई -

महाराष्ट्रात आज करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असून ते 93.08 टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, आज

दिवसभरात 4,757 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे या आजारापासून खबरदारी घेणे तितकेच महत्वाचे आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज 4,757 करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर 7,486 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आज एकूण 17,23,370 रुग्ण बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या एकूण 80,079 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.08 टक्के झालं आहे.