<p><strong>मुंबई - </strong></p><p>राज्यात आज दिवसभरात 8 हजार 66 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 17 लाख 3 हजार 274 करोना बाधित रुग्ण बरे </p>.<p>होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 92.70 टक्के इतके झाले आहे. तर आज राज्यात 5 हजार 182 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आज 115 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.58 टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.</p>