राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

आतापर्यंत 15 लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई -

राज्यात आज 4 हजार 909 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 6 हजार 973 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत

राज्यात 15 लाख 31 हजार 277 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 90.46 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 120 करोना मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.61 टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजवर तपासण्यात आलेल्या 91 लाख 20 हजार 515 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 92 हजार 693 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 95 हजार, 666 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 11 हजार 969 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात 1 लाख 16 हजार 543 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 4 हजार 909 करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 16 लाख 92 हजार 693 इतकी झाली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com