राज्यात आज ‘इतके’ नवे करोनाबाधित

15 हजार 789 जणांना डिस्चार्ज
राज्यात आज ‘इतके’ नवे करोनाबाधित

मुंबई -

महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अद्यापही वाढत आहे. आज राज्यात

17 हजार 66 नवे करोनाबाधित आढळले असून, 257 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शिवाय, 15 हजार 789 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज रुग्णालयांमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 10 लाख 77 हजार 374 वर पोहचली आहे.

राज्यातील 10 लाख 77 हजार 374 करोनाबाधितांच्या संख्येत 2 लाख 91 हजार 256 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण व आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या 7 लाख 55 हजार 850 जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

आजपर्यंत राज्यात 7 लाख 55 हजार 850 जण करोनामुक्त झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट 70.16 टक्के आहे. आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या 53 लाख 21 हजार 116 नमून्यांपैकी आजपर्यंत 10 लाख 77 हजार 374 नमूने (20.2 टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस राज्यात 17 लाख 12 हजार 160 जण होम क्वारंटाइन आहेत, तर 37 हजार 198 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com