पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

369 नवे रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे -

पुणे शहरात आज दिवसभरात शहरात 369 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1 लाख 58 हजार 756 वर गेली आहे. आज

21 जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले, त्यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा हा 4 हजार 66 वर पोहचला आहे.

करोनावर उपचार घेणारे 818 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज दिवसा अखेरीस 1 लाख 46 हजार 912 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पुण्याप्रमाणेच शेजारील पिंपरी-चिंचवड परिसरातही करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कायम आहे. दिवसाभराअखेरीस पिंपरी-चिंचवड शहरात 200 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 193 जणांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 86 हजार 296 वर पोहचली असून पैकी, 82 हजार 510 जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 336 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com