पुणे -

पुणे शहरात आज 465 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 9 जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी 3 जण

पुण्याबाहेरील आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही आता दोन हजारांपेक्षा अधिक झाली आहे. शहरात सक्रिय रूग्ण संख्या आज 2 हजार 156 इतकी झाली आहे. तर विविध रूग्णालयांत 308 रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, 154 रूग्ण गंभीर आहेत.

आज 184 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आतापर्यंत 10 लाख 85 हजार 539 हजार जणांची करोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी 1 लाख 96 हजार 389 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 89 हजार 421 जण कोरोनामुक्त झाले आहेत.