पुणे -

पुणे शहरात आज 259 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत शहरातील एकूण रुग्णांची संख्या 1,82,448

इतकी झाली आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4,693 इतकी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 380 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आजअखेर 1 लाख 75 हजार 154 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 146 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 17 जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात दोन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.