पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

1 हजार 691 नवे करोनाबाधित
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे -

पुणे शहरात आज दिवसभरात 1 हजार 691 नवे करोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर

43 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 22 हजार 448 झाली आहे. आजअखेर 2 हजार 875 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1 हजार 563 रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत 1 लाख 2 हजार 95 रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी दिवसभरात 997 जण करोनाबाधित आढळले असून,16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 188 जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण करोनाबाधितांची एकूण संख्या 65 हजार 379 वर पोहचली असून यापैकी, 51 हजार 510 जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 407 एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com