मुंबई -

महाराष्ट्रात आज 132 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 28 हजार 699 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्बल 88.73 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

आज राज्यात दिवसभरात एकूण 13 हजार 165 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दुसरीकडे एकूण 28 हजार 699 नव्या करोनाबाधितांची भर देखील पडली आहे.

त्यामुळे राज्यातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा आता 25 लाख 33 हजार 026 इतका झाला आहे. त्यापैकी 2 लाख 30 हजार 641 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर करोनामुळे राज्यात आजपर्यंत 53 हजार 589 मृत्यू झाले आहेत.