मुंबई -

महाराष्ट्रात आज 2 हजार 768 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 1 हजार 739 जण करोनातून बरे झाले आहेत

तसेच 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 20 लाख 41 हजार 398 वर पोहचली आहे. आतापर्यंत 19 लाख 53 हजार 926 जण करोनातून बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह केसेसची संख्या 34 हजार 934 आहे असून, आजपर्यंत 51 हजार 280 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट - 95.78 टक्के) आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्या आलेल्या 1,49,28,130 नमुन्यांपैकी 20 लाख 41 हजार 398 नमूने (13.67 टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 73 हजार 504 जण गृह विलगीकरणात असून, 1 हजार 980 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.