मुंबई -

महाराष्ट्रात आज 27 हजार 918 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 139 रूग्णांचा मृत्यू झाला

आहे. राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत 54 हजार 422 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 40 हजार 542 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज 23 हजार 820 रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 23,77,127 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 85.71 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,96,25,065 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 27,73,436 (14.13 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16,56,697 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 17 हजार 649 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.